प्रतिनिधी -अभिजीत लेंभे
कोरेगाव दि.१९| शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई संस्थेच्या वाठार स्टेशन शाखेचा 13 वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी शाखा कार्यालयामध्ये संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक व ठेव संकलन प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहात व आनंदीमय वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी संस्थेचे सन्माननीय संचालक तथा कोरेगाव विभागाचे पालक संचालक मा.श्री. संतोष चव्हाण, विभागीय अधिकारी श्री. शरद जाधव, शाखा कार्यक्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक व इतर विविध क्षेत्रातील सर्व सभासद आणि मान्यवर उपस्थित होते.
शाखेचे शाखाधिकारी श्री. नितीन मस्के, शाखेतील सर्व सहा. अधिकारी व ठेव संकलन प्रतिनिधी यांच्या तर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.


























