Homeताज्या बातम्यासंत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र...

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे ७५५ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असून ही सायकलवारी कार्तिक शुद्ध एकादशी रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर वरून श्री क्षेत्र घुमाणकडे प्रस्थान करेल अशी माहिती पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री सुभाष भाबुरे यांनी दिली.

श्री सुभाष भाबुरे म्हणाले , श्री नामदेव दरबार कमीटी,भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, घुमाण व समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण या सुमारे २५०० किलोमीटरच्या रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात येते .वारीचे हे ४ थे वर्ष आहे रविवार दि. २ नोव्हेंबर ते दि. ३ डिसेंबर २०२५ या दरम्यान या रथयात्राचे व सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्तिक शुद्ध एकादशी संत नामदेव महाराज यांची ७५५ वी जयंती , संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ व्या संजीवन समाधी सोहळा व गुरूनानक जयंती याचे औचित्य साधून संत नामदेव महाराजांच्या पंढरपूर येथील जन्म स्थानावरून यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

ही रथयात्रा व सायकल वारी महाराष्ट्रासह गुजरात राजस्थान हरियाणा व पंजाब राज्यातून मार्गक्रम करणार आहे या सायकल यात्रेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकल रायडींग केलेल्या व ५० पेक्षा अधिक वयोमान असलेल्या सुमारे ११० सायकल पटूनी सहभाग नोंदविला आहे. ही रथयात्रा व सायकलवारी महाराष्ट्र सह गुजरात , राजस्थान , हरियाणा व पंजाब राज्यातून मार्गक्रमण करणार आहे. राष्ट्रीय स्तरावर निघणारी देशातील पहिली अध्यात्मिक सायकलवारी असून या वारीद्वारे भागवत धर्माच्या शांती समता आणि बंधुता या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येतो.

यावेळी भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भीसे , संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर माऊली नामदास , पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर टेमघरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक बापूसाहेब उंडाळे, सचिव अँड , विलास काटे , खजिनदार मनोज मांढरे , विश्वस्थ राजेंद्रकृष्ण कापसे , राजेंद्र मारणे सल्लागार डॉ. राजगोपाल खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एकाच वेळी दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग बाधकांमुळे टेक्नी 20L पेक्षा जास्त गमावतो

0
पुणे: डेक्कन येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर (२५) यांना गेल्या वर्षी जून ते फेब्रुवारीदरम्यान दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत 20 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.तंत्रज्ञ...

रात्रीचे तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढतो: डॉक्स

0
पुणे: संपूर्ण शहरात कमाल तापमान ३९-४१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उष्माघातासह उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढत असताना रात्रीचे वाढते तापमान ही गंभीर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय

0
पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

0
पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने 50% खर्चाचा हिस्सा नाकारला; ‘निराशाजनक’, खासदार अशोक चव्हाण म्हणाले

0
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणाऱ्या प्रलंबित नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाला मोठा धक्का बसला असून, कर्नाटक राज्य सरकारने आता त्याचा 50% खर्च...

error: Content is protected !!