Homeताज्या बातम्यासातारकरांचा उत्स्फूर्त सहभाग : ‘नमो युवा रन’ मॅरेथॉन जल्लोषात संपन्न

सातारकरांचा उत्स्फूर्त सहभाग : ‘नमो युवा रन’ मॅरेथॉन जल्लोषात संपन्न

सातारा : नशामुक्त भारताचा संदेश देत साताऱ्यात रविवारी सकाळी ‘नमो युवा रन’ मॅरेथॉनचे जल्लोषात आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सोहळ्याला सातारकर युवक-युवतींसह सर्वधर्मीय नागरिकांनी उत्साहाने धाव घेतली.

कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी ऑनलाईन शुभेच्छा देऊन केले. तर मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. आ. अतुल भोसले यांच्यासह भाजपचे मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

पहाटेपासूनच शहरातील पोलीस कवायत मैदान येथे युवक-युवतींची गर्दी जमू लागली होती. शिवतीर्थापासून पवई नाका, आंबेडकर चौक, जामा मशीद, गोलबाग, पंचमुखी गणपती मंदिर, शनिवार चौक, मल्हारपेठ, पोलीस मुख्यालय असा शहरातील प्रमुख मार्गावरून मॅरेथॉन काढण्यात आली. नागरिकांनी ठिकठिकाणी पाणी व अल्पोपहाराची सोय करून धावपटूंना दाद दिली.

जवळपास तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. गरीब, कष्टकरी, शेतमजूर अशा सर्व स्तरातील लोकांनी या उपक्रमात सहभागी होऊन शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. विशेष म्हणजे कोणतेही शुल्क न आकारता सहभागींसाठी आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

या मॅरेथॉनला संदीप परामणे, अनिल माळी, सुनील काळेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सक्रिय पाठबळ दिले. तर विजय काटवटे, पायल जाधव, सुरभी भोसले, संग्राम बर्गे, अभय जाधव, शफी इनामदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.

शहरातील पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या पत्रिकेचे अनावरण केले होते.

‘नमो युवा रन’ मुळे साताऱ्यात सामाजिक ऐक्य, जातीय सौहार्द आणि नशामुक्तीचा दृढ संदेश पोहोचल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान...

0
डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण...

0
🌺 मातृदेवता : संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाची जिवंत मूर्ती! 🌺 समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या आयुष्याला...

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

error: Content is protected !!