Homeताज्या बातम्या*सोमथळी येथे बाळूमामा पालखीचे जल्लोषात स्वागत ; भक्तांची अलोट गर्दी*

*सोमथळी येथे बाळूमामा पालखीचे जल्लोषात स्वागत ; भक्तांची अलोट गर्दी*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क . फलटण

फलटण तालुक्यातील सोमथळी गावात श्री बाळूमामा यांच्या पालखी आगमनानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, युवराज चोपडे व बाळू चोपडे यांच्या निवासस्थानी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून बाळूमामा यांची पवित्र पालखी चोपडे कुटुंबाच्या घरासमोर विराजमान असून दर्शनासाठी भाविकांची सतत गर्दी होत आहे.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या आरती व धार्मिक कार्यक्रमास ग्रामस्थांसह परिसरातील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. “बाळूमामा चांगभलं”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भक्तांनी हात वर करून मोठ्या भक्तिभावाने आरती व नामस्मरण केले.

या प्रसंगी प्रा. रवींद्र कोकरे सर यांनी उपस्थित भाविकांना बाळूमामा यांच्या जीवनकार्याबद्दल अत्यंत सुंदर विचार मांडत प्रभावी प्रबोधन केले. त्यांनी श्रद्धा, सेवा, आई-वडिलांचा सन्मान, समाजातील ऐक्य आणि चांगल्या विचारांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थित भाविक भारावून गेले.

कार्यक्रमाला लोकमतचे.तालुका प्रतिनिधी प्रा. विकास शिंदे उपस्थित होते

कार्यक्रमादरम्यान भजन, नामस्मरण तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील युवकांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतल्याचे दिसून आले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रियेला गती देण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात | पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

error: Content is protected !!