Homeताज्या बातम्या*२२ फाटा धुळदेव येथे ह.भ.प. नवनाथ कोलवडकर महाराज यांचे प्रेरणादायी प्रवचन; बाळूमामांच्या...

*२२ फाटा धुळदेव येथे ह.भ.प. नवनाथ कोलवडकर महाराज यांचे प्रेरणादायी प्रवचन; बाळूमामांच्या भक्तीचा, व्यसनमुक्तीचा व आई-वडिलांच्या सेवेचा दिला संदेश*

२२ फाटा धुळदेव येथे ह.भ.प. नवनाथ कोलवडकर महाराज यांचे प्रेरणादायी प्रवचन; बाळूमामांच्या भक्तीचा, व्यसनमुक्तीचा व आई-वडिलांच्या सेवेचा दिला संदेश

धुळदेव प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

२२ फाटा धुळदेव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धार्मिक व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमात ह.भ.प. नवनाथ कोलवडकर महाराज यांनी आपल्या ओजस्वी प्रवचनातून उपस्थित भाविकांना भक्ती, संस्कार, व्यसनमुक्ती आणि आई-वडिलांच्या सेवेचा अनमोल संदेश दिला. त्यांच्या प्रभावी वाणीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

महाराजांनी आपल्या प्रवचनात बाळूमामांच्या भक्तीचे महत्त्व सांगताना श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. “बाळूमामांची भक्ती ही फक्त पूजा नसून ती चांगले विचार, समाजसेवा आणि प्रेमाची शिकवण आहे,” असे सांगत त्यांनी भक्तांना संस्कारांची वाट चालण्याचा संदेश दिला.

यावेळी त्यांनी युवकांना व्यसनाच्या विळख्यातून दूर राहण्याचे आवाहन करत परखड शब्दांत मार्गदर्शन केले. “दारू, तंबाखू, गुटखा यांसारखी व्यसने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त करत आहेत. युवकांनी व्यसनापासून दूर राहून भक्ती, समाजकार्य आणि आई-वडिलांच्या सेवेचा मार्ग स्वीकारला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

आई-वडिलांविषयी बोलताना महाराजांनी उपस्थितांना भावनिक संदेश दिला. “आई-वडील हेच खरे देव आहेत. त्यांचा आदर करा, त्यांची सेवा करा आणि त्यांचा सत्कार करा. ज्या घरात मातापित्यांचा सन्मान होतो, त्या घरात सुख, शांती आणि देवाची कृपा कायम राहते,” असे हृदयस्पर्शी विचार त्यांनी मांडले.

प्रवचनादरम्यान उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात महाराजांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमानंतर आयोजकांच्या वतीने ह.भ.प. नवनाथ कोलवडकर महाराज यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी संतोष भोईटे तालुका प्रतिनिधी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क , राजेंद्र भोईटे, संतोष भोईटे, सुहास भंडलकर, दत्ता जाधव, महेश भंडलकर तसेच तिरंगा गणेश उत्सव तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सभासद आणि महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील भंडलकर, अमोल भंडलकर, ओंकार जाधव, किशन भंडलकर, रवींद्र भंडलकर, महाराज गोपी भंडलकर, पप्पू पवार, सचिन घाटे, महेश तळेकर, लिया खत शेख, गोविंद भंडलकर, अशोक जाधव, जलील शेख, विष्णू पंढरी, पिनू पंढरी आणि शरद जगताप यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थ, वारकरी, युवक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून महाराजांच्या प्रेरणादायी विचारांची उपस्थितांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रियेला गती देण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात | पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

error: Content is protected !!