16 जुलै 2026
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमंत निर्मलादेवी बालक व प्राथमिक विद्यामंदिर ,विद्यानगर फलटण या प्रशालेत
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त प्रशालेमध्ये विद्यार्थी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते या सोहळ्याची तयारी अतिशय उत्साहाने करण्यात आली होती
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
, स्कूल कमिटीच्या व्हाईस चेअरमन वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, स्कूल कमिटी सदस्य सौ. नूतन शिंदे, श्री चंद्रकांत पाटील सर, श्री.रणजित निंबाळकर सर प्रशासन अधिकारी श्री.निकम सर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.जाधव मॅडम, बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ..खलाटे मॅडम या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले त्यानंतर विठ्ठलाची व ज्ञानेश्वरांची आरती करण्यात आली इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांचे अभंग गायन झाले व त्यानंतर चौथीच्या मुलांचे वारकरी नृत्य झाले. शालेय परिसर भक्तीमय वातावरणाने रंगून गेला होता. .सर्व विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम ,चांगदेव वासुदेव ,वारकरी ,वेशभूषा परिधान करून आले होते फुगेवाले, गंध वाले , पानफुल वाले,पोलीस दादा बनले होते. शालेय परिसर विठू माऊली, ज्ञानोबा माऊलींच्या नावाने भक्तिमय झाला होता .पालखीचे प्रस्थान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. पालखीचा मार्ग शाळा लाकडी चौक, गोळीबार मैदान, विद्यानगर परिसर याप्रमाणे दिंडीचे मार्गक्रमण झाले
पालखी शाळेत पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. अशा रीतीने प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थी पालखी दिंडी सोहळा अतिशय भक्तिमय व उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.


























