Homeताज्या बातम्या*फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना...

*फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती*

फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती

फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसह शहरातील विविध विकासकामांशी संबंधित एकूण २१ विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय सगुणामाता नगर येथील साई मंदिरासमोरील ‘रामराजे उद्यान’ या उद्यानाच्या नामांतराचा ठरला. उद्यानाचे नाव बदलून ‘संत सगुणामाता उद्यान’ करण्याचा प्रस्ताव अशोक जाधव यांनी मांडला. या प्रस्तावाचे वाचन सौ. मंगलादेवी नाईक निंबाळकर यांनी केले, तर किरण राऊत यांनी अनुमोदन दिले.

चर्चेदरम्यान ज्येष्ठ नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी उद्यानाला माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे नाव देण्याची सूचना केली. त्यावर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी, कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या नावाने आधीच खाजगी संस्थांचे नामकरण झाले असल्याने शासकीय उद्यानाला ‘संत सगुणामाता उद्यान’ हेच नाव देण्यात यावे, अशी भूमिका मांडली. त्यानंतर सभेने संबंधित प्रस्तावास मान्यता दिली.

सभेत शहरातील अतिक्रमणाचा मुद्दाही गाजला. नगरसेवक पंकज पवार यांनी हा विषय उपस्थित करत प्रभावी कारवाईची मागणी केली. यावेळी नगराध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला गती देण्याचे निर्देश देत पुढील सभेपूर्वी ठोस कार्यवाही करण्याचा इशारा दिला.

मोकळ्या खासगी भूखंडांच्या स्वच्छतेच्या मुद्द्यावर नगरसेवक विकास काकडे, सचिन अहिवळे आणि पांडुरंग गुंजवटे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर संबंधित भूखंड मालकांना नोटिसा बजावण्यात येतील, स्वच्छता न केल्यास नगरपरिषद स्वच्छता करून त्याचा खर्च संबंधित मालकांच्या मालमत्ता करात समाविष्ट करेल, असा निर्णय घेण्यात आला.

यावेळी पाणीपुरवठा विभागासाठी जेसीबी भाड्याने घेण्याच्या विषयावरही सभागृहात चर्चा झाली.तसेच आगामी आषाढी वारी व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनबारी, हिरकणी कक्ष, स्वच्छता मोहीम आणि इतर आवश्यक सुविधांसह वारीसंदर्भातील १९ कामांना मंजुरी देण्यात आली.

याशिवाय, शहरात छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणी सईबाई आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांच्या उभारणीच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. अल्पसंख्याक विकास योजनेंतर्गत अहिंसा मैदान येथे निवारा शेड उभारणे, कुरेशी नगरमधील विकासकामे तसेच शहरातील २१ खुल्या जागा नगरपरिषदेच्या नावे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेलाही मंजुरी देण्यात आली.

उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरातील जुन्या हातपंपांची दुरुस्ती, नवीन बोअरवेल मंजूर करणे, गोळीबार मैदान येथे पाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणे तसेच काळूबाई नगर येथील पाण्याची टाकी तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

या विशेष सभेत शहर विकास, मूलभूत सुविधा आणि पालखी सोहळ्याच्या नियोजनाशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने आगामी काळात विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीकरांनो, पाण्याचा जपून वापर करा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; शहरात दोन दिवस पाणीपुरवठा...

0
बारामतीकरांनो, पाण्याचा जपून वापर करा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण रविवार, १८ ऑक्टोबरला बारामती शहरासह...

फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांकडून माळजाई मंदिरात उत्साहात महाआरती आणि महाप्रसाद

0
फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांकडून माळजाई मंदिरात उत्साहात महाआरती आणि महाप्रसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण नगरपरिषदेच्या सर्व महिला सफाई कामगारांनी श्री माळजाई मंदिर परिसर...

कर्जदारांच्या वेदना कोण समजून घेणार? आर्थिक संकटग्रस्त कुटुंबांना न्यायाची प्रतीक्षा!

0
कायदेशीर हक्क, प्रक्रिया, कागदपत्रांची सत्यता आणि सक्षम प्राधिकरणाचे आदेश यांचे पालन झाले पाहिजेत. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण " लाखो रुपयांच्या कर्जासाठी कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची लूट...

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार...

0
फलटण कृषी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजारात १५१४ पिशव्यांची म्हणजेच...

मुधोजी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन फलटण:

0
मुधोजी महाविद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फ. ए. सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग...

error: Content is protected !!