येळेवस्ती (घाडगेवाडी) शाळेत दिंडी सोहळा उत्साहात संपन्न-
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येळेवस्ती (घाडगेवाडी), केंद्र – बिबी येथे शनिवार दि.18.7.2026 रोजी वारकरी परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने शाळेत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, भगवे ध्वज आणि विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषेत सहभागी होत वस्तीतून भक्तिमय दिंडी काढली. संपूर्ण परिसर “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी” अशा नामघोषाने दुमदुमून गेला.
दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी अभंग, भजन आणि संतवचने सादर करून वारकरी संप्रदायातील समता, भक्ती, सेवा, प्रेम आणि सदाचार यांचा संदेश दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संतपरंपरेची ओळख होऊन सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन झाले. या दिंडीमध्ये अंगणवाडी विद्यार्थ्यांनी सुद्धा उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. सदर कार्यक्रमाला घाडगेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री.किरण येळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संतोष येळे, उपाध्यक्ष श्री.अनिल येळे , घाडगेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक श्री.ज्ञानेश्वर येळे ,बिबी त्याचबरोबर शाळेचे माजी मुख्याध्यापक व सध्या कराड तालुक्यात केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झालेले श्री. गणेश पवार साहेब यांचा निरोप समारंभ करण्यात आला यावेळेस ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनीही त्यांना भेटवस्तू दिल्या आदरणीय श्री.गणेश पवार साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमाला शाळेच्या स्वयंसेविका सौ.पल्लवी भोसले, अंगणवाडी सेविका सौ.निता येळे मॅडम, सौ.प्रियांका भोसले वस्तीवरील सर्व ग्रामस्थ पालक आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. केंद्रप्रमुख श्री.पवार साहेब यांच्या वतीने सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ यांना अल्पोपहार देण्यात आला.शेवटी येळेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री.गणेश तांबे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


























