Homeताज्या बातम्याहुतात्मा नागु कातकरी यांना अभिवादन

हुतात्मा नागु कातकरी यांना अभिवादन

पुणे भोर नसरापूर दि.१० |जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिन या दुहेरी पर्वाचे औचित्य साधून शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने कातकरी वस्तीवर विशेष उपक्रम राबविण्यात आला. ‘हर घर तिरंगा’ या देशभक्तिप्रेरक मोहिमेअंतर्गत वस्तीतील प्रत्येक घरात राष्ट्रीय ध्वज पोहोचविण्यात आला तसेच आदिवासी समाजातील नागु कातकरी यांनी ब्रिटिश सरकारच्या जुलमी राजवटी विरुद्ध भूमिगत राहून आंदोलन केले. त्यांना ब्रिटिशांनी पकडून देहदंडाची शिक्षा दिली. त्यांच्या या हुतात्म्याचे स्मरण म्हणून तसेच स्वातंत्र्यलढ्यातील मोलाच्या योगदानाची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. घाडगे यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भाषण करताना सांगितले की, “भारत ७५ वर्षांचा स्वातंत्र्य प्रवास पूर्ण करत असताना देखील अनेक आदिवासी समाज घटक आजही शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सामाजिक प्रगतीसाठी शिक्षण ही पहिली पायरी आहे. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या मुलांना शाळा व महाविद्यालयात नियमित पाठवावे.” त्यांनी आदिवासी समाजाने स्वातंत्र्यलढ्यात दाखविलेल्या शौर्य आणि त्यागाच्या उदाहरणांचा संदर्भ देत पुढील पिढीला प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

या उपक्रमात NSS स्वयंसेवकांनी वस्तीतील प्रत्येक कुटुंबाला राष्ट्रीय ध्वज देऊन देशभक्तीचा संदेश दिला. त्याचबरोबर स्वच्छता, एकता आणि शैक्षणिक जागृतीचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमादरम्यान स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

कार्यक्रमाला NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. जगदीश शेवते, प्रा जाधवर दयानंद, प्रा. जीवन गायकवाड, प्रा. माऊली कोंडे, प्रा. महेश कोळपे, पत्रकार विशाल शिंदे , स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या आयोजनामुळे वस्तीतील वातावरण देशभक्तीने भारावून गेले आणि शैक्षणिक जाणीवेचा नवा संदेश पोहोचला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

# *शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना...

0
# शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना संबोधन   **गाडीच्या टपावर उभे राहून आंदोलकांशी साधला संवाद; परिसरात राजकीय वातावरण...

*बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती*

0
बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे बरड येथे...

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण*

0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत...

*मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश* *लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध...

0
मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध कला प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर...

*धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल*! *प्रभाग क्रमांक १८५ आणि...

0
धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल! समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. मुंबई प्रभाग क्रमांक १८५ आणि ९० फूट मार्गावरील कचरा न उचलल्याने नागरिक...

error: Content is protected !!