Homeताज्या बातम्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व डॉ. एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व डॉ. एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

कोल्हापूर, दि. 26: उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतात. सन- 2024-25 यावर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी कोल्हापूर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क व ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे एक लाख, 75 हजार, 50 हजार, 25 हजार इ. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते. तसेच राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालयसेवक यांना प्रत्येकी 50 हजार रु. तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रु. इ. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

*फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहे*

0
फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतात वनक्षेत्रातील झाडांची तोड वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत नियंत्रित असून, कोणत्याही...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

0
पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रुग्णालयात दाखल

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

error: Content is protected !!