Homeताज्या बातम्याअहिल्यानगरमध्ये पोलिस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल; पोलिस दलात खळबळ

अहिल्यानगरमध्ये पोलिस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल; पोलिस दलात खळबळ

अहिल्यानगर: जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्याच पोलिस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचं आमिष दाखवून एका ३० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अहिल्यानगरमधील कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) यांनी ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या काळात पालघर येथील एका फार्म हाऊसवर तसेच मुंबईतील जोगेश्वरी येथे पीडित तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी त्यांनी पीडितेला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. मात्र, नंतर त्यांनी लग्नास नकार दिला आणि “आपल्यात जे घडलं ते विसरून जा नाहीतर तुला जीवे मारीन,” अशी धमकीही दिली, असं पीडितेने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

पीडित तरुणीने वारंवार विनंती करूनही दराडे यांनी लग्नास नकार दिला आणि ‘तुला जे करायचं ते कर’ असं म्हणून तिला धमकावलं. यानंतर पीडितेने अखेर तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आणि कार्यवाहीसाठी हा गुन्हा पालघर जिल्ह्यातील मनोर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पोलिस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावरच अशा प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिस दलातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भाजपवाले पुण्याच्या कोंढव्याचा उल्लेख पाकिस्तानचा कराची असा करतात; एफआयआर दाखल केला

पुणे: या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कोंढव्याचा "पाकिस्तानची कराची" असा उल्लेख केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप युवा शाखेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा...

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या मागील पाण्यात बुडून मृत्यू झाला. नवलख उंब्रे गावाजवळील जाधववाडी धरणावर...

*फलटण. 1 मे रोजी साजरा झालेल्या तथागत गौतम बुद्ध जयंती मिरवणुकीत पोलीस निरीक्षक...

फलटण : शहरात १ मे रोजी साजऱ्या झालेल्या तथागत गौतम बुद्ध जयंती मिरवणुकीत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी रात्री १० वाजता वाद्य बंद करण्यास...

error: Content is protected !!