*शंकरराव भेलके महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न*
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार साहेब यांच्या निधनामुळे सदरचा पारितोषीक वितरण समारंभ महाविद्यालयाने अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडला, कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, प्रसिद्ध विनोदी लेखक तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य सु.ल.खुटवड तसेच समन्वयक रचना फाउंडेशन व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीपाद कोंडे यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पुढे महाराष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विनोदी लेखक तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य सु.ल.खुटवड तसेच समन्वयक रचना फाउंडेशन व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीपाद कोंडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.पौर्णिमा कारळे यांनी केले प्रास्ताविकामध्ये त्यांनी महाविद्यालयाचा सर्वांगीण आढावा घेतला तसेच महाविद्यालय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर काम करीत असून महाविद्यालयाने समाजामध्ये आपले स्थान बळकट केले आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.आर.बी.ढाकणे यांनी करून दिला. तसेच प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.तुषार शितोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
आपल्या आयुष्याच्या पलीकडेही सुंदर जीवन जीवन आहे त्याचा उपभोग सगळ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन समन्वयक रचना फाउंडेशन व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीपाद कोंडे यांनी यावेळी केले पुढे आपल्या कष्टाची चीज होण्यासाठी ज्ञान महत्वाचे असून आयुष्यत कधीही हार मनू नये असे सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विनोदी लेखक तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य सु.ल.खुटवड यांनी महाविद्यालयाने जगण्याची उमेद दिली असून, आयुष्यात विसंगती ज्याला शोधता येतील त्याला चांगले जीवन जगता येईल असे प्रतिपादन केले, पुढे त्यांनी आपल्या आयुष्यातील वेगवेगळे विनोदी किस्से सांगत उपस्थितांची तसेच विद्यार्थ्यांची मने जिंकून आयुष्यात सकारात्मक बदला घेता आला पाहिजे असे सांगितले.
महाविद्यालयीन जीवन हे स्वप्ननाचे जीवन असून ह्या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये टिकता यायला हवे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील परीक्षा, क्रीडा, विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धा, महाविद्यालय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, वेगवेगळ्या वैयक्तिक स्पर्धा, अविष्कार संशोधन स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी सर्व सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच यावेळी माजी विद्यार्थी संघातर्फे वाणिज्य विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये जी गुणवंत विद्यार्थिनी कु. तन्वी सुनील जगताप प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे तिला कै.रवींद्र कोंडे यांच्या स्मरणार्थ रु.५००० चे रोख बक्षीस देण्यात आले.
यावेळी शैक्षणिक नैपुण्य यांचे वाचन ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, क्रीडा विभागाचे वाचन डॉ.पौर्णिमा कारळे, सांस्कृतिक विभाग/वाणिज्य विभाग/अविष्कार/एन.एस.एस. या विभागांचे नैपुण्य वाचन प्रा.माऊली कोंडे आणि प्राध्यापक नैपुण्य चे वाचन डॉ,जगदीश शेवते यांनी केले. कार्यक्रमास पालक प्रतिनिधी, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष आप्पा सावंत, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप लांडगे यांनी केले तर आभार प्रा.सहदेव रोडे यांनी मानले.


























