Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रांजणगाव गणपतीसह पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रांजणगाव गणपतीसह पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींच्या पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. २३:- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासह गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच याच परिसरातील कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींचे प्रश्न सुध्दा तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री, आमदार दिलीप वळसे-पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (नवि-2) डॉ. के. एच. गोविंदराज, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, एमआयडीसीचे सह-व्यवस्थापक डॉ. कुणाल खेमनार, मानसिंग पाचुंदरकर-पाटील यांच्यासह दृकश्राव्य माध्यमाद्वारे पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे-पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

या बैठकीत रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, कारेगावसह हिवरे ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर विशेष चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रांजणगाव गणपती हे गाव अष्टविनायकांपैकी एका गणपतीचे स्थान असल्यामुळे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शिवाय या गावाच्या लगत एमआयडीसी असल्यामुळे येथे असणारे कामगार तसेच हे गाव प्रमुख रस्त्यालगत असल्याने बाहेरील लोकांची स्थलांतरीत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर गावातील पायाभूत सुविधा सक्षम करणे ही अत्यावश्यक गरज असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. या भागातील वाढती लोकसंख्या आणि भाविकांचा सततचा ओघ लक्षात घेऊन एमआयडीसीने या भागात विकास कामे करताना जिल्हा परिषदेशी समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत रांजणगाव गणपतीसह कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण आदी विषयांवरील अडचणी मांडल्या. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, एमआयडीसी अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तींचे विसर्जन न करता नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन* *समशेरसिंह*नाईक निंबाळकर* ...

0
**दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तींचे विसर्जन न करता नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन* *समशेरसिंह*नाईक निंबाळकर* नगराध्यक्ष* *फलटण नगर परिषद* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण **पाण्याची बचत व जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी...

वाठार निंबाळकर येथे हिट अँड रन; २७ वर्षीय महिलेचा मृत्यू दुचाकीला अज्ञात चारचाकीची...

0
वाठार निंबाळकर येथे हिट अँड रन; २७ वर्षीय महिलेचा मृत्यू दुचाकीला अज्ञात चारचाकीची समोरून धडक; पती व दोन मुली जखमी, चालक फरार फलटण, प्रतिनिधी : समर्थ...

माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या संकटावर तोडगा काढण्यासाठी माजी...

0
माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी संकटावर तोडगा काढण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांची मुख्यमंत्र्यांशी भेट! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दुष्काळाची परिस्थिती मांडली; दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळण्याची...

फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने...

0
फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त... समर्थ 24 तास न्यूज...

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा महावितरणला इशारा; विनापरवाना कामे केल्यास गुन्हा दाखल करणार!

0
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा महावितरणला इशारा; विनापरवाना कामे केल्यास गुन्हा दाखल करणार!   **नवीन वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत खांबांच्या कामांसाठी NOC घेणे बंधनकारक करण्याची मागणी;...

error: Content is protected !!