निरगुडी ग्रामपंचायत सदस्यांना नागरिकांचा थेट इशारा – कर मागायला येऊ नका, येणाऱ्या आगामी निवडणुकीत घरात बसूनच करा प्रचार करावा!
फलटण दि.२८| कापसे वस्ती ते निरगुडी या रोडची अक्षरशः दैन्यावस्था झाली असून रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वस्तीवरील नागरिकांचे हाल होत आहेत.
रस्त्याची ही दुर्दशा लक्षात घेऊन संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे की, “या वस्तीवर राहणाऱ्या लोकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी मागायला येऊ नये. तसेच आगामी निवडणुकीचा प्रचार आपल्या घरात बसूनच करावा.”
स्थानिकांचा स्पष्ट संदेश आहे की, नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी पाठ फिरवली, तर कर आणि निवडणूक प्रचाराला विरोध करण्यात येईल.
सदर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कापसे वस्ती–निरगुडी रोडची दुरुस्ती न झाल्यास नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.


























