Homeताज्या बातम्यापंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा, दि.3- शैक्षणीक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासुन वंचित राहू नये यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष 43 हजार व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 38 हजार प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.

या योजनेंतर्गत १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एससी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रथम, व्दितीय, तृतीय वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज २६ऑक्टोबर पर्यत http://hmas.mahait.org वर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्यान विभागाच्या सहायक संचालक कांचन जगताप यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गोखळी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश तानाजी गावडे पाटील यांची निवड.

0
गोखळी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश तानाजी गावडे पाटील यांची निवड. प्रतिनिधी. सुमित काळे फलटण पूर्व भागातील शंभर वर्ष परंपरा असलेली सहकारातील गोखळी विविध कार्यकारी...

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार; श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या फलटण फेस्टिव्हल २०२६ चा...

0
शहराचा पुसट झालेला सांस्कृतिक वारसा गडद करण्याचे काम फलटण फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू! माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार; श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या फलटण फेस्टिव्हल २०२६...

कोळकीतील खासगी क्लासमध्ये पाचवीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण! शिक्षिकेसह नववी-दहावीतील काही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल;...

0
कोळकीतील खासगी क्लासमध्ये पाचवीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण! शिक्षिकेसह नववी-दहावीतील काही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; दहा वर्षीय मुलाच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे वन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण,...

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा.

0
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भोंडल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात...

सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई...

0
सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी फलटण, प्रतिनिधी : सांगवी येथे...

error: Content is protected !!