फलटण दि.२९| श्रीमंत सार्वजनिक नवरात्र उत्सव बुधवार पेठ फलटण येथील नवरात्र उत्सव मंडळांत सालाबादप्रमाणे यंदाही श्रीस्वामी समर्थ तसेच देवीचा दरबार असे विविध देखावे सादर केले आहेत हे देखावे पाहण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी होत आहे.
समर्थ चोवीस ताससी बोलताना श्रीमंत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री कीरण दळवे , श्री गणेश कापसे म्हणाले की ह्या मंडळास चाळीस वर्षं पूर्ण झाली आहेत.फलटण मध्ये असे एकमेव नवरात्र उत्सव मंडळ आहे जे कोणतीही वर्गणी गोळा करत नाही सर्व महिला रोज त्यांच्या दैनंदिन खर्चातून त्यांच्या ऐपतीप्रमाणे दहा वीस तर कोणी शंभर रुपये काढून ठेवतात आणि देवीसाठी वर्षातून एकदा खर्च करतात.
मंडळातर्फे दरवर्षी लहान मुलांसाठी आणि महीलांसाठी संगीत खुर्ची, रक्तदान शीबीर , नऊ दिवस उपवासाचे पदार्थ, डान्स स्पर्धा, तसेच होम मिनिस्टर यांसारखे कार्यक्रम तसेच भावीक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.


























