Homeताज्या बातम्यासासकल जन आंदोलन समितीच्या प्रयत्नांना यश : फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाण...

सासकल जन आंदोलन समितीच्या प्रयत्नांना यश : फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाण रस्ता दुरुस्तीसाठी ५ लाख निधी मंजूर

फलटण दि.२९ | फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाणास जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था, जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यालगत वाढलेले काटेरी कुंपण यामुळे नागरिकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत होता. या रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेक छोटे-मोठे अपघात झाले होते. शेवटी सासकल जन आंदोलन समितीच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीला यश मिळाले आहे.

सदर प्रश्नावर तोडगा निघण्यासाठी सासकल जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी हरिबा मुळीक, उपाध्यक्ष विनायक नारायण मदने, सासकल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सोनाली मंगेश मदने, ग्रामपंचायत सदस्य हणमंत गंगाराम मुळीक, चांगुणा सर्जेराव मुळीक, राजेंद्र धोंडीबा घोरपडे, लक्ष्मीबाई रमेश आडके,सामाजिक कार्यकर्ते व भैरवनाथ फाउंडेशनचे ज्ञानेश्वर हरिबा मुळीक, दिनेश दत्तात्रय मुळीक यांच्यासह सर्व पदाधिकारींनी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतली.

ग्रामस्थांच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून माजी खासदार निंबाळकर यांनी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्याशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावर आमदार सचिन पाटील यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधत सासकल गावासाठी क्र. 402 जा. क्र. ग्रापं-04/कावि/4848/2025 नुसार ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अशा स्पष्ट सूचना देखील आमदारांनी दिल्या. यामुळे सासकल ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता झाली आहे.

सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थांच्या वतीने आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास...

0
जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास मनाई; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण २४ ते...

मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान

0
मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क मुधोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. ललित...

दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि...

0
📰 दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज...

बांधकाम कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू! २१ ऑक्टोबर २०२६...

0
मुंबई : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी या...

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवताना आता शिक्षकांच्या हजेरीचीही ऑनलाइन नोंद घेतली जाणार आहे. राज्यातील...

0
स्विफ्टचॅटवरील स्मार्ट उपस्थिती पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी अनिवार्य, चॅटबॉटचा वापर समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवताना आता शिक्षकांच्या हजेरीचीही ऑनलाइन नोंद...

error: Content is protected !!