Homeताज्या बातम्या*फलटणमध्ये चायनीज मांजाचा पुन्हा कहर! आठवड्यातील दुसऱ्या घटनेत माजी सैनिक गंभीर जखमी*

*फलटणमध्ये चायनीज मांजाचा पुन्हा कहर! आठवड्यातील दुसऱ्या घटनेत माजी सैनिक गंभीर जखमी*

*फलटणमध्ये चायनीज मांजाचा पुन्हा कहर! आठवड्यातील दुसऱ्या घटनेत माजी सैनिक गंभीर जखमी*

डेक्कन चौकात गळ्यावर धारदार मांजा लागला; नागरिकांच्या तत्परतेने वाचला जीव – बंदी असूनही शहरात चायनीज मांजाची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप

फलटण . समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण शहरात बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे आणखी एक गंभीर अपघात घडला असून, आठवडाभरात ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जाधववाडी (ता. फलटण) येथील माजी सैनिक शिवाजी मुगुटराव बुधावले हे डेक्कन चौक परिसरातून जात असताना त्यांच्या गळ्यावर धारदार चायनीज मांजा लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर परिसरातील काही सतर्क युवकांनी तातडीने धाव घेत बुधावले यांना फलटणमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नागरिकांनी वेळेवर मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.

शासनाने चायनीज मांजाच्या विक्री व वापरावर स्पष्ट बंदी घातलेली असतानाही फलटण शहरातील काही भागांत हा जीवघेणा मांजा खुलेआम विकला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. मात्र, या प्रकाराकडे संबंधित यंत्रणा आणि पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

धारदार चायनीज मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि पक्षी दरवर्षी जखमी होत असतानाही प्रतिबंधित मांजाविरोधात प्रभावी कारवाई होत नसल्याने संतापाची भावना व्यक्त होत आहे. या घटनेनंतर नागरिकांनी, “एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्यानंतरच पोलिस प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

शहरात सुरू असलेल्या चायनीज मांजाच्या विक्रीवर तातडीने धाडसत्र राबवून संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

चौकट :

आठवड्यातील दुसरी गंभीर घटना

काही दिवसांपूर्वी दत्ता दादा जाधव (वय ४५, रा. कुरणेवाडी, ता. बारामती) हे कामानिमित्त फलटण शहरातील सोमवार पेठ परिसरातून दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर हवेत अडकलेला धारदार चायनीज मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. या अपघातात त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. आठवड्याच्या आत घडलेल्या या दुसऱ्या घटनेमुळे चायनीज मांजाविरोधात तातडीने कठोर कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

चौकट :

नागरिकांची मागणी

शहरातील चायनीज मांजाच्या विक्रीवर तातडीने धाडसत्र राबवावे.

बंदी असलेला मांजा विकणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत.

पतंग उडविण्याच्या ठिकाणी पोलिस व महापालिका/नगरपरिषदेकडून विशेष पथके तैनात करावीत.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती मोहीम राबवावी.

अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर अंमलबजावणी करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

# *शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना...

0
# शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना संबोधन   **गाडीच्या टपावर उभे राहून आंदोलकांशी साधला संवाद; परिसरात राजकीय वातावरण...

*बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती*

0
बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे बरड येथे...

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण*

0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत...

*मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश* *लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध...

0
मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध कला प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर...

*धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल*! *प्रभाग क्रमांक १८५ आणि...

0
धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल! समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. मुंबई प्रभाग क्रमांक १८५ आणि ९० फूट मार्गावरील कचरा न उचलल्याने नागरिक...

error: Content is protected !!