Homeताज्या बातम्या*फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध* *सुनेत्रा पवार...

*फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध* *सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध*; *फोटोला जोडे मारत घोषणाबाजी, कार्यकर्त्यांचे आंदोलन* *

फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध; फोटोला जोडे मारत घोषणाबाजी, कार्यकर्त्यांचे आंदोलन

फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या प्रदेशाध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने बुधवारी फलटण नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आमदार सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध नोंदविला. संबंधित वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.

या वेळी फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांनी आंदोलनाला संबोधित करत कोणत्याही राजकीय नेत्याबाबत किंवा महिलांबाबत अवमानकारक भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी बाब असल्याचे सांगितले. सार्वजनिक जीवनात जबाबदारीची जाणीव ठेवून वक्तव्ये करावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रामभाऊ ढेकळे, प्रमोद निंबाळकर, हरिषअप्पा काकडे, नगरसेवक राहुल निंबाळकर, सचिन अहिवळे, सुवर्णाताई अहिवळे, मीना काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला असून भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नमो शक्ती रथा’ला हिरवा झेंडा*

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नमो शक्ती रथा’ला हिरवा झेंडा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची मोफत तपासणी; नागपूरपासून महाराष्ट्रभर उपक्रम राबविणार मुंबई : मुख्यमंत्री...

# *शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना...

0
# शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना संबोधन   **गाडीच्या टपावर उभे राहून आंदोलकांशी साधला संवाद; परिसरात राजकीय वातावरण...

*बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती*

0
बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे बरड येथे...

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण*

0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत...

*मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश* *लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध...

0
मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध कला प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर...

error: Content is protected !!