Homeताज्या बातम्या*श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी ( 75 वर्ष)...

*श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी ( 75 वर्ष) निमित्त योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी ( 75 वर्ष) निमित्त योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न.

– मुलांचे व महिलांचे आरोग्य, आहार आणि योग्य झोप तज्ञयासोबतच योग व प्राणायमचे महत्व यावर मार्गदर्शन

(प्रतिनिधी): समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण एज्युकेशन सोसायटीचे,श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर सस्तेवाडी, फलटण येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी (७५ वे वर्ष) वर्षानिमित्त महिला व विद्यार्थ्यांसाठी विशेष योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगगुरू सौ. रेखा भरत खिलारे (योगरेखा योग इन्स्टिट्यूट, फलटण) आणि योगशिक्षिका प्रणाली सोनिक गाडेकर, राधिका सतीश नाळे, दिपाली पिसाळ व पूजा शिंदे या उपस्थित होत्या.

मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्दे:

योगासनाचे महत्त्व: दैनंदिन जीवनात योगासनाचे महत्त्व विशद करताना वक्त्यांनी सांगितले की, मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी रोज योग करणे अत्यंत गरजेचे आहे.

संतुलित आहार: मुलांचा आणि महिलांचा आहार कसा असावा, त्यातून योग्य पोषणमूल्ये कशी मिळतात आणि जंक फूड टाळणे का आवश्यक आहे, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

पुरेशी झोप: उत्तम आरोग्यासाठी केवळ आहार आणि व्यायाम पुरेसा नसून निरोगी शरीरासाठी वेळेवर आणि पुरेशी झोप घेणे किती महत्त्वाचे आहे, हे उदाहरणांसह पटवून देण्यात आले.

“स्त्री ही कुटुंबाचा कणा असते. घराची आणि घरातील सर्व सदस्यांची देखभाल करताना बहुतांश महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच महिलांनी स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे, योग्य आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन योगगुरू सौ. रेखा भरत खिलारे यांनी केले.

घरातील सर्वांना वाढल्यानंतर उरलेले अन्न खाण्याची किंवा स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करण्याची सवय महिलांनी सोडली पाहिजे. महिलांनी आपल्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे, हिरव्या पालेभाज्या, फळे व पुरेसे पाणी यांचा समावेश करावा. स्वतःचा आहार वेळेवर घेणे हेच निरोगी आरोग्याची पहिली पायरी आहे.

आपल्या दैनंदिन जीवनातील आपल्या बसण्याच्या उठण्याच्या पद्धती यांचाही आपल्या शरीरावर खोल परिणाम होत असतो.

जेवल्यानंतर किंवा काम करताना पुढे झुकून किंवा पोक काढून (Slouching) बसल्यामुळे पोटातील अवयव दबले जातात. यामुळे अन्न पचनाची गती मंदावते. परिणामी, एसिडिटी (Acid Reflux), गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठासारख्या (Constipation) समस्या निर्माण होतात.

फुफ्फुसे आणि श्वसनसंस्था (Respiratory System):

खांदे पाडून आणि वाकून बसल्याने छातीची पोकळी आकुंचन पावते. यामुळे फुफ्फुसांना पूर्णपणे विस्तारण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. परिणामी, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन थकवा येणे, जलद श्वास घ्यावा लागणे आणि कामातील एकाग्रता कमी होणे यांसारखे त्रास होतात.असे मार्गदर्शन योगशिक्षिका मॅडम यांनी केले.

सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या योग सेशनला महिला पालकांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांनी विविध योगासनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून पाहिले. यासाठी राधिका मॅडम,प्रणाली मॅडम, दिपाली मॅडम व पूजा मॅडम यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.

कार्यक्रमाचे नेटके आयोजन व नियोजन फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर, सस्तेवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. महिला पालकांना सुद्धा या उपक्रमामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहार, झोप, योग, प्राणायाम यांचे महत्त्व पटले. व महिलापालिकांनी सुद्धा या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.हा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. रुपेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे सर यांनी केले.सूत्रसंचालन सौ. अनिता बागल मॅडम यांनी केले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे विषयी माहिती तेजस्विनी शिंदे मॅडम यांनी सांगितली व आभाराचे काम सौ. शर्मिला माने मॅडम यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटण तालुक्यात युरियाचा तीव्र तुटवडा; व्यापाऱ्यांकडून तोंड पाहून वाटप*? *कृषी विभाग गंभीर दखल...

0
फलटण तालुक्यात युरियाचा तीव्र तुटवडा; व्यापाऱ्यांकडून तोंड पाहून वाटप? कृषी विभाग गंभीर दखल घेणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल फलटण, प्रतिनिधी ,समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क : फलटण...

*चायनीज मांजाच्या विळख्यात सापडलेल्या घुबडाला मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमकडून जीवनदान*

0
चायनीज मांजाच्या विळख्यात सापडलेल्या घुबडाला मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमकडून जीवनदान   फलटण | प्रतिनिधी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   चायनीज मांजाच्या विळख्यात अडकून जखमी झालेल्या घुबडाला मुधोजी...

*फलटण तालुकात हरितक्रांती होण्याच्या साठी ‘अटल आनंद घन वन प्रकल्प’ पहिले पाऊल : जेष्ठ...

0
फलटण तालुकात हरितक्रांती होण्याच्या साठी 'अटल आनंद घन वन प्रकल्प' पहिले पाऊल : जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क | फलटण आपण मियावाकी...

error: Content is protected !!