Homeताज्या बातम्यानिरगुडी गावातील नागरिकांचा संताप – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्काराचा...

निरगुडी गावातील नागरिकांचा संताप – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

फलटण | निरगुडी गावातील प्रलंबित प्रश्नांवर गावपुढाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर व मतदानावर गावातील नागरिक बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.गावात वर्षानुवर्षे विविध मागण्या प्रलंबित आहेत. होलार समाजाला आजही हक्काचा रस्ता नाही, दलित वस्तीला २०१७ पासून संरक्षण भिंतीची मागणी असून जुलै २०२४ मध्ये ३४ लाख रुपये मंजूर झाले तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. कापसे वस्ती ते निरगुडी रस्ता दयनीय अवस्थेत असून बौद्ध वस्तीतील नागरिक सुद्धा रस्त्यापासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे लोंढे वस्तीतील नागरिक पुलासाठी अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत, पण आश्वासनापलीकडे काहीच झालेले नाही. तसेच धनगर व मातंग समाजाची समाजमंदिराची मागणी अद्याप अपूर्ण आहे.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुका आल्या की आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात विकासकामे होत नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे म्हणाले, “गावामध्ये श्रेयवाद, आडवा-आडवी, जीरवा-जीरवी आणि काम करण्याची इच्छाशक्ती नसल्यामुळेच पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत गावपुढाऱ्यांची उदासीनता स्पष्ट दिसते.”

दरम्यान, माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत सोनवणे, निलेश गोरे, यांच्या नेतृत्वाखाली गावातील सर्व समाजघटकांना एकत्र आणून निवडणुकीवर बहिष्कार घालण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.गावकऱ्यांच्या या संतप्त भूमिकेमुळे आगामी निवडणुकीत मोठे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दर्जेदार शिक्षण समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले

मिलिंद जोशी यांनी संपादित केलेल्या आणि शिवाजीराव कदम यांना समर्पित 'अमृतसंचय' या स्मरणीय खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुणे : राज्याचे जलसंपदा...

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण पुणे .येथील सावरकर अध्यापन केंद्रात डॉ. अर्जुन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिमालयातील दुर्गम भागात...

*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि...

मुधोजी हायस्कूलमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण   उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि पुन्हा...

*फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन शैक्षणिक...

शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप उत्साहात समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन...

सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात

सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान, मात्र कारवाईत सातत्य राखण्याचे प्रशासनासमोर आव्हान प्रशासनाच्या ;...

error: Content is protected !!