Homeताज्या बातम्या*फलटण ग्रामीण भागात लुटमारीच्या तयारीतील टोळीवर पोलिसांची धडक कारवाई*

*फलटण ग्रामीण भागात लुटमारीच्या तयारीतील टोळीवर पोलिसांची धडक कारवाई*

फलटण ग्रामीण भागात लुटमारीच्या तयारीतील टोळीवर पोलिसांची धडक कारवाई

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

दोघे जेरबंद; तिघे फरार, लुटमारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त

फलटण, प्रतिनिधी : फलटण ग्रामीण भागात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना जेरबंद केले असून तिघे आरोपी फरार झाले आहेत. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील चोरी व लुटमारीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फलटण ग्रामीण भागातील मांडवखडक, ता. फलटण गावच्या हद्दीत हॉटेल वाणगावच्या बाजूला संशयित इसम रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला.

पोलिसांना घटनास्थळी पाच संशयित आरोपी आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा सुमारे दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. यावेळी दोन आरोपींना ऊसाच्या शेतातून तसेच कुंरवळीच्या तलावाजवळून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल नाना धुळे (रा. इंदिरानगर, फलटण) आणि नंदकुमार भागोजी सोनवणे (रा. शिरपवाडी, ता. फलटण) यांचा समावेश आहे. या प्रकरणातील तिघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

आरोपींकडून लुटमार व चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींकडून ग्रामीण भागातील यापूर्वीच्या अनेक चोरी व लुटमारीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, सुशार नलवडे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटण तालुक्यात युरियाचा तीव्र तुटवडा; व्यापाऱ्यांकडून तोंड पाहून वाटप*? *कृषी विभाग गंभीर दखल...

0
फलटण तालुक्यात युरियाचा तीव्र तुटवडा; व्यापाऱ्यांकडून तोंड पाहून वाटप? कृषी विभाग गंभीर दखल घेणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल फलटण, प्रतिनिधी ,समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क : फलटण...

*चायनीज मांजाच्या विळख्यात सापडलेल्या घुबडाला मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमकडून जीवनदान*

0
चायनीज मांजाच्या विळख्यात सापडलेल्या घुबडाला मुधोजी क्लबच्या बास्केटबॉल टीमकडून जीवनदान   फलटण | प्रतिनिधी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   चायनीज मांजाच्या विळख्यात अडकून जखमी झालेल्या घुबडाला मुधोजी...

*फलटण तालुकात हरितक्रांती होण्याच्या साठी ‘अटल आनंद घन वन प्रकल्प’ पहिले पाऊल : जेष्ठ...

0
फलटण तालुकात हरितक्रांती होण्याच्या साठी 'अटल आनंद घन वन प्रकल्प' पहिले पाऊल : जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क | फलटण आपण मियावाकी...

error: Content is protected !!