*फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा*
*बेकायदेशीर स्फोटके साठ्यावर फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 24 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त*
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
*फलटण, दि. 30 जुलै 2026:* फलटण तालुक्यातील मौजे बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरात बेकायदेशीररित्या आणि मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने स्फोटके साठवून ठेवल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे *रु. 24,72,001/-* किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
*घटनेचा थोडक्यात तपशील:*
दि. 29/07/2026 रोजी सायंकाळी 19:50 वाजता मौजे बरड येथील रांजणी पुनर्वसन येथील बंद मराठी शाळेसमोरील मैदानात एका ट्रक मध्ये बेकायदेशीर स्फोटके साठवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी *ट्रक क्र. MH 11 CH 2555* ची तपासणी केली असता, त्यामध्ये कोणत्याही वैध परवान्याशिवाय आणि लोकवस्तीच्या ठिकाणी निष्काळजीपणे स्फोटके ठेवल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून *Ecoprime 83 mm चे 500 बॉक्स आणि Superpower 90 चे 4 बॉक्स* असा एकूण 504 बॉक्स स्फोटकी पदार्थ आणि संबंधित ट्रक जप्त केला आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात *गु.र.नं. 454/2026* अन्वये स्फोटके अधिनियम 1884 चे कलम 9(B)1(B), स्फोटके अधिनियम 1908 चे कलम 5 आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 288 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*आरोपी:*
1. शंकरलाल बेनीराम जाट, रा. बरड, ता. फलटण
2. हेमराज महावीर जाट, मूळ रा. भिलवाडा, राजस्थान, सध्या रा. बरड, ता. फलटण (अटक)
सदर कारवाई माननीय श्री निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, माननीय श्रीमंती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धन्यकुमार गोडसे आणि पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत सुबनावळ हे करीत आहेत.
*- जनसंपर्क अधिकारी, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे*


























